बीड संबंध महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प हरिसाल, अमरावती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात बीड जिल्हाधिकारी यांना सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आले. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी शिवकुमार या अधिकार्याचा कीती त्रास होत असेल याची प्रचिती येते, सदर घटनेमुळे विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बीड जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात विवीध मागण्या करण्यात आल्या आहेत.
आरोपी विनोद शिवकुमा(निलंबित उपवनसंरक्षक) याला कायम स्वरूपी बडतर्फ करून त्याच्याविरूद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२,३५४(A),३७६(C) प्रमाणे न्यायालयीन खटला चालवण्यात यावा, तसेच शिवकुमारला पाठीशी घालणाऱ्या एम.एस.रेड्डी,अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक,मेळघाट याला देखील या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे व अटक करून कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करावे, संबंधित प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरापाचे असुन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे व विशेष सरकारी अभियोक्ता म्हणुन ॲड.उज्जल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच शिवकुमार व रेड्डी यांची त्वरित विभागीय चौकशी करावी, दिपाली चव्हाण यांना होणार्या त्रासाबद्द्ल त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्याकडे तक्रार केली होती, दीपाली चव्हाण व आरोपी शिवकुमार यांच्या ऑडिओ संभाषणामध्ये आमदार राजकुमार पटेल यांचा उल्लेख आहे, त्या कारणामुळे या घटनेचे पाळेमुळे किती खोलवर आहेत याची प्रचिती येते, सदरील प्रकरणात खासदार नवनीत राणा व आमदार राजकुमार पटेल यांची सखोल चौकशी करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन बीड जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.