Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक्सप्रेस गाड्यांना आकारणार पॅसेंजरचे तिकिट दर, भुसावळहुन धावणाऱ्या गाडीचा समावेश

train
, मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (09:49 IST)
कोरोना काळापासून रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्यांना मेल आणि एक्स्प्रेसचा दर्जा देऊन तशा पद्धतीने वाढीव प्रवासभाडे आकारत आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. मात्र आता काही गाड्यांना तिकिट दरात सूट देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून त्यामुळे प्रवासीवर्गात आनंदाचे वातावरण आहे.
 
भुसावळ-नागपूर आणि अजनी-अमरावती-अजनी या दोन गाड्यांना आता गाड्यांच्या तिकिटासाठी पॅसेंजर गाड्यांचे प्रवासभाडे आकारल्या जाणार आहे. या दोन्ही गाड्या इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मेमु’ ट्रेन आहेत. त्यांना एक्सप्रेस गाड्याचे दर आकारल्या जात होते. आता या गाड्यांच्या तिकिटासाठी पॅसेंजर गाड्यांचे प्रवासभाडे आकारल्या जाणार आहे.
 
दरम्यान, कोवीड महामारीत अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता सर्वकाही सुरळीत झाले. तरी देखील अद्यापही पॅसेंजर गाड्या बंदच आहे. पॅसेंजर गाड्या रद्द करून मेमु गाड्या चालविल्या जात आहे. या गाड्यांना मेल आणि एक्स्प्रेसचा दर्जा देऊन वाढीव भाडे आकारले जात आहे. यामुळे प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागतोय. मात्र आता रेल्वेने मेमु गाड्यांना पॅसेंजरचे दर लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.

Edited By -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भोकरदन तालुक्यात भीषण गारपीट, वीज कोसळून दोघांचा मृत्यू