Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रवाशांनी लक्ष द्या ! रेल्वे मंडळा कडून दिवाळीसाठी विशेष गाड्या चालणार

प्रवाशांनी लक्ष द्या ! रेल्वे मंडळा कडून दिवाळीसाठी विशेष गाड्या चालणार
, बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (11:36 IST)
गेल्या 2 वर्षा पासून कोरोना मुळे गाड्या बंद होत्या आणि सण देखील साध्या पद्धतीने साजरे करायचे होते. पण यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे आणि आपले दैंनदिन जीवन देखील रुळांवर आले आहे. दिवाळीचा सण काहीच दिवसांवर आला आहे. दिवाळीनिमित्ताने लोक एकाठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ये जा करतात. गाड्यात गर्दी असल्यामुळे रिजर्वेशन उपलब्ध नसतात. अशा परिस्थितीत लोकांना मनस्तापाला सामोरी जावे लागते. सरकार ने दिवाळीसाठी काही विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. 
 
प्रवाशांना ऐन सणासुदीत काही त्रास होऊ नये या साठी मध्य रेल्वे विभाग फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन सुरु करत आहे. या विशेष  गाड्या मुंबई -पुणे आणि नागपूर करमाळी कडे धावणार .या फेस्टिव्हल विशेष ट्रेनचे रिजर्वेशन मिळणे आजपासून सुरु करण्यात येत आहे. दिवाळीत प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या साठी रेल्वेने हे पाऊल घेतले आहे. या गाड्यांचे आरक्षण आज पासून मिळणार असून त्यासाठी प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार. 
 
या विशेष गाडयांची वेळ अशी असणार -
नागपूर ते करमाळी पर्यंत धावणारी ट्रेन 1239 30 ऑक्टोबर ते  20 नोव्हेंबर पर्यंत दर शनिवारी नागपूरवरून 15:50 वाजता सुटेल.आणि 14:30 ला करमाळी स्थानकावर पोहोचेल. तर करमाळी पासून दर रविवारी 20 :40 वाजून सुटेल आणि 20:10 वाजता नागपूर ला पोहोचेल.ही विशेष ट्रेन वर्धा, बडनेर, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम स्थानकांवर थांबणार. ही ट्रेन एक  एसी 2 टायर, 4 एसी 3 टायर , 11 स्लीपर क्लास  6  सेकण्ड क्लास डब्यासह असणार.
 
मुंबई -नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल ट्रेन  छत्रपती शिवाजी टर्मिनल्स सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 01247 दर शुक्रवारी 29 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 22:55 
वाजता निघणार आणि दुसऱ्या दिवशी 13: 10 वाजता नागपूर ला पोहोचेल.
तर दर शनिवारी 17:40 वाजता सुटणारी 01248 ही सुपरफास्ट विशेष ट्रेन मुबंईत सकाळी 8:30 ला पोहोचेल.
 
ही विशेष ट्रेन कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा स्थानकांवर थांबणार. या गाडीत 1 एसी फर्स्ट क्लास, 2 एसी -2 टायर, 5 एसी -3 टायर 5 स्लीपर कोच, आणि 6 सेकण्ड क्लास  असणार.
 
याव्यतिरिक्त पुणे ते जोधपूर राजस्थान भागात की कोठी ही विशेष ट्रेन 22 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रत्येक शुक्रवारी 20:10 वाजता 01249 ट्रेन पुण्याहून निघणार आणि भगत की कोठी येथे 19:55 वाजता पोहचणार. 02149 ही साप्ताहिक विशेष ट्रेन दर शनिवारी भगत की कोठी पासून 22:20 वाजता निघून 19:05 वाजता पुण्यात येईल. ही ट्रेन लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, भिलडी,धणेरा,राणीवाडा,मारवाड, भिनमल, मोड्रान, जालोर, मोकलसर, समाधारी, लुनी या स्थानकांवर थांबा घेणार.   या गाडीत 1 एसी -2 टायर, 4 एसी -3 टायर, 11 स्लीपर क्लास आणि 6 सेकंड क्लास चेअर कार असणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज जाहीर होणार इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल