Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रवाशांनी एसटी बसमध्येच छत्री उघडून केला प्रवास

STbus at Safale Agar
, रविवार, 25 जून 2023 (16:28 IST)
social media
राज्यात अखेर मान्सूनने हजेरी लावली आहे. मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे रस्त्यात पाणी साचले असून रस्ते तुडुंब भरले आहे. पहिल्या पावसामुळे पाणी साचल्याने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पावसामुळे एसटी बसमध्ये गळती होऊन बसमधील प्रवाशांनी छत्री उघडून प्रवास करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओ मध्ये एसटी बसला गळती होऊन बसमधील प्रवासी चक्क छत्री खोलून प्रवास करत आहे. 

सदर व्हिडीओ पालघरच्या सफाळे आगारातील एसटीबसचा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारावर प्रश्न केले जात असून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  
राज्यात सध्या मान्सूनचे आगमन झाले असून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक खोळंबली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे वर पावसाचा परिणाम झाला असून लोकल 15 ते 20 मिनिट विलंबाने  धावत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Google : गुगलची Google Album Archive ही सेवा बंद होणार