राज्यात यंदा दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारनं तयारीला सुरुवात केली आहे. राज्य सरकारच्या वतीनं 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे.
या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि इंटरनेटची सुविधा नसल्याच्या अडचणींमुळं परीक्षेचा अर्ज भरण्यात अडथळा येत आहे.
मात्र यावर राज्य सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. शिक्षण विभागानं परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधीपर्यंतही अर्ज सादर करता येतील असे निर्देश दिले आहेत. तसंच यासाठी कोणतंही विलंब शुल्कही आकारला जाणार नाही.