Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांना धमकी देणारा PFI नेता मतीन शेखानी फरार

Raj Thackeray
, सोमवार, 18 एप्रिल 2022 (15:00 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी देणारा पीएफआय नेता मतीन शेखानी फरार झाला आहेत. महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरच्या वादाबाबत पीएफआयचे नेते मतीन शेखानी यांनी राज ठाकरेंना खुली धमकी देत ​​‘छेडेंगे तो छोडेंगे नही’ असे म्हटले होते. मतीन शेखानी यांच्याविरोधात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून मतीन शेखानी फरार आहे. मुंबई पोलिसांची दोन पथके शेखानीचा शोध सुरू केली आहेत.
 
महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवावेत या मागणीचा पुनरुच्चार केला. यासाठी महाराष्ट्र सरकारला 3 मे पूर्वी कारवाई करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
 
3 मे पूर्वी मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर मनसे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण करतील, अशी धमकी राज ठाकरेंनी दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PM Modi Gujarat Visit:पंत प्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर