Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संसदेत आधी ठाकरे पिता पुत्राचे फोटो हटवले, तर संजय राऊतांनाही बसणार धक्का

Rahul Shevale
, मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (21:05 IST)
काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह शिंदे गटाला दिले. यानंतर आता शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. आज संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले. त्यांच्याजागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तर दुसरा धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच, संसदेतील मुख्यनेते पदावरून खासदार संजय राऊत यांना काढण्यात येणार असून याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.
 
शिंदे गटाने विधीमंडाळातील शिवसेनेच्या कार्यालयानंतर संसदीतल शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा मिळवला. त्यानंतर ठाकरे गटाकडून संसदेमधील ज्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या, त्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यानंतर मुख्यनेतेपदी असलेले संजय राऊत यांच्याकडून हे पद काढून घेण्यात येणार असून या पदावर गजानन किर्तीकर यांची निवड होण्याची शक्यता आहे. तर, सर्वोच्च न्यायालयातही सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु असून या आठवड्यामध्ये याचा निकाल लागण्याचं शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटासह अनेकांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर