Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फोन लावण्यासाठी पायलटला विमान ५ मिनिटं थांबवायला सांगितलं, एकनाथ शिंदेंचा किस्सा व्हायरल

फोन लावण्यासाठी पायलटला विमान ५ मिनिटं थांबवायला सांगितलं, एकनाथ शिंदेंचा किस्सा व्हायरल
, मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (12:48 IST)
मागील काही दिवसांपासून एकच नेते चर्चेत आहे ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आता त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. नाशिकच्या मालेगाव येथे सोमवारी झालेल्या सभेतही एकनाथ शिंदे यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 
 
एकनाथ शिंदे हे यावेळी आपल्या झटपट कामाची पद्धत याबद्दल बोलत होते, तेव्हा आपण मुख्यमंत्री झालो तरी त्यांच्यातील कार्यकर्ता कधीच मरणार नाही असे सांगताना त्यांनी आपण डायरेक्ट फोन उचलून काम करण्याचे आदेश देतो, असे म्हटले.
 
आपली कार्यपद्धती समजावून सांगतेने एकनाथ शिंदे यांनी मालेगावमधील या सभेत एक किस्सा सांगितला जो सध्या व्हायल होत आहे. शिंदे यांनी फोन लावण्यासाठी थेट विमान थांबवले असे सांगितले. 
 
किस्सा असा आहे...
मुंबईच्या लीलावती रुग्णालयात एकनाथ शिंदे यांच्या ओळखीतील व्यक्तीवर उपचार सुरु असताना तपासणीचे रिपोर्ट मिळण्यास काही कारणाने उशीर होत होता. त्याबद्दल सांगताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की अरे माणूस गेल्यावर फोन करून काय उपयोग? माणूस जिवंत करण्यासाठी फोन केला पाहिजे ना. त्यावेळी मी विमानात बसलो होतो. लीलावती रुग्णालयात असलेल्या अधिकाऱ्याला फोन लागत नव्हता, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 
अधिकाऱ्याचा फोन बिझी येत असल्याने मी विमानाच्या वैमानिकाला सांगितलं की, 5 मिनिटं थांब मला एक महत्त्वाचा फोन लावायचा आहे. त्यानंतर मी फोन लावला. विमानाचा पायलट 10 मिनिटं थांबून होता. मी फोन केला आणि रिपोर्ट लगेच आला. माझा फोन वेळेवर गेला नसता तर काय उपयोग होता? सरकार हे लोकांना न्याय देण्यासाठी पाहिजे. लोक सरकारसाठी नसावेत, तर सरकार लोकांसाठी असले पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 
 
मात्र, हा किस्सा सांगताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचं विमान हे हवेत होतं की जमिनीवर याचा नेमका खुलासा केला नसल्याने सोशल मीडियावर हे प्रकरण ट्रोल होत आहे. फोन लावला तेव्हा त्यांच विमान हवेत होतं की जमिनीवर असा प्रश्न विचारला जात आहे. शिंदे यांनी सांगितलेला किस्सा चांगलाच व्हायरल होत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Reliance Jio 5G देशात 5G सेवा सुरू करण्याबाबत रिलायन्स जिओने दिली ही महत्त्वाची माहिती, आकाश अंबानींनी केली ही मोठी घोषणा