कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये ५० टक्के सार्वजनिक गणेश मंडळं यंदा गणपती उत्सव साजरा करणार नसल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली आहे. नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन बिष्णोई यांनी नागरिकांना केले आहे. तसेच, यावर्षी गणपती विसर्जनाला परवानगी देण्यात आलेली नाही. नियमांचे उल्लंघन करून गणपती विसर्जन केल्यास त्या मंडळावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी मंडळांना दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. शहरातील ५० टक्के सार्वजनिक गणेश मंडळ गणपती उत्सव साजरा करणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. नियमांचं पालन करून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी रक्तदान शिबिर किंवा प्लाझ्मा डोनेशन असे उपक्रम घ्यावेत असे ही संदीप बिष्णोई यांनी आवाहन केले आहे.