Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमरावती उमेश कोल्हे हत्याकांडाच्या मास्टरमाइंडला पोलिसांनी अटक केली

arrest
महाराष्ट्रातील अमरावती हत्याकांडाचा मास्टरमाइंड शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली. यासह उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे.अमरावती हत्याकांडाचा मास्टरमाइंड इरफान शेख रहीम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
 
या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे 22 वर्षीय मुदस्सीर अहमद, 25 वर्षीय शाहरुख पठाण, अब्दुल तौफिक 24, शोएब खान 22, अतिब रशीद 22 आणि युसुफकान बहादूर खान 44 अशी आहेत. नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यावरून अमरावतीच्या मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड इरफान खान याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी इरफान हा एक एनजीओ चालवतो त्यानेच उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश मारेकरींना दिले होते. त्याच्या आदेशानुसारच उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेचे आणि 18 महिन्यांत 10 लाख नोकऱ्या देण्याच्या घोषणेचे कौतुक केले