suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाकरे गटाला मोठा धक्का, कोकणात राजकीय भूकंप

ठाकरे गटाला मोठा धक्का
कोकणातील राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (UBT) मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणातून ठाकरे गटासाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. युवासेनेचे आक्रमक चेहरे आणि माजी तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षाला राम राम ठोकला आहे.

खताते हे केवळ नेते नसून खेर्डी आणि आसपासच्या परिसरात संघटना मजबूत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांचे दांडगे जनसंपर्क आहे.
 
निष्ठावंतांची नाराजी: स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा अभाव आणि पक्षश्रेष्ठींकडून होणारे दुर्लक्ष यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. यामुळे अनेक कार्यकर्ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळत आहेत.
 
निवडणुकीतील पिछेहाट: लोकसभा आणि विधानसभेपाठोपाठ नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती) निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा पराभव स्वीकारावा लागला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजपने मोठी मुसंडी मारली आहे.
 
या पक्षांतरामुळे शिंदे गटाची ताकद कोकणात अधिक वाढणार असून, स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. जर हीच परिस्थिती कायम राहिली आणि कार्यकर्त्यांशी संवाद सुधारला नाही, तर कोकणात उरलेली संघटना पूर्णपणे ढासळू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ashok Kharat's Major Confession अशोक खरातची मोठी कबुली: महिलांच्या लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासे