Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात लॉकडाऊनवरून राजकारण सुरू

महाराष्ट्रात लॉकडाऊनवरून राजकारण सुरू
, मंगळवार, 30 मार्च 2021 (16:10 IST)
कोरोनाच्या दूसऱ्या लाटे दरम्यानही सर्वात मोठा धोका हा महाराष्ट्रात दिसून येत आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यताही वाढत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे संकेत दिले होते, परंतु आता संपूर्ण लॉकडाऊनविरोधातही आवाज उठविला जात आहे.
 
वास्तविक, महाराष्ट्रात गेल्या एका आठवड्यात एक लाखाहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत, अशा परिस्थितीत बऱ्याच जिल्ह्यात त्यांच्या पातळीवर पूर्ण लॉकडाऊन लादण्यात आलं आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय खुला ठेवण्याच्या सूचना राज्यातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील लोक या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करीत नाहीत. दरम्यान, रात्री रस्त्यावर गर्दी कमी व्हावी, म्हणून सध्या संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. परंतु पूर्ण लॉकडाऊन करण्याची शक्यता तीव्र होत असताना स्वतंत्र विधाने येऊ लागली आहेत. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितले की, लोकांनी नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन देखील टाळता येऊ शकतो.
 
नवाब मलिक म्हणाले की, आम्हाला आणखी एक लॉकडाउन परवडू शकत नाही, म्हणूनच मुख्यमंत्र्यांना इतर पर्यायांवर विचार करण्याचे आवाहन केले. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक विधान केले ज्यामध्ये ते म्हणाले की जर लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर सरकार लॉकडाऊन लादण्यास मागेपुढे पाहणार नाही. सरकारमध्ये असलेली राष्ट्रवादी काँग्रेसच नाही, तर विरोधी पक्ष भाजपदेखील संपूर्ण लॉकडाऊनला विरोध करत आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रकांत पाटील म्हणाले की कोरोना संकटावर अंकुश ठेवण्यासाठी आता लॉकडाऊन हा उपाय नाही. आणि फक्त भाजपच नाही तर प्रत्येक सामान्य माणूस, व्यापारी अशा कोणत्याही निर्णयाला विरोध करणार आहेत.
 
नेत्यांव्यतिरिक्त महिंद्रा ग्रुपच्या आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाऊनला विरोध केला. त्यांनी ट्विट करुन लिहिले की, आता वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून विषाणूचा बचाव होऊ शकेल. मजूर-छोट्या व्यवसायासाठी आणखी एक लॉकडाउन धोकादायक असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणून पार्थ पवार यांनी घेतली भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट