Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : माझा अरुण बेकसूर

Pooja Chavan
, मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (09:11 IST)
राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण जोरदार चर्चेत आहे, रो नवीन नवीन गोष्टी बाहेर येत आआहे. या प्रकरणात नाव पुढे आलेल्या अरुण राठोडच्या धारावती तांडा या गावी जाऊन त्याच्या आईची प्रतिक्रिया जाणून घेतली. माझा अरुण बेकसूर हाय… त्याच्यावरील संमदे आरोप खोटे हाय… असा टाहोच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोडच्या आईने फोडला. पण अरुण नेमका कुठे आहे हे त्यांनाही माहीत नसल्याचा दावा अरुणच्या आईने केला आहे. त्यामुळे आता अरुण नेमका कुठे आहे? असा सवाल निर्माण झाला आहे.
 
पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर अरुण चव्हाणचं एका मंत्र्यासोबत संभाषण असलेल्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर अरुणचे कुटुंबीय गायब झाले होते. चार दिवसानंतर बीड जिल्ह्यातील परळी येथील धारावती तांडा येथील घरी अरुणचे कुटुंबीय परतले आहेत. यावेळी अरुणच्या आईशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अरुण निर्दोष असल्याचं सांगितलं.
 
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरुणचं नाव येत आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? असा सवाल अरुणच्या आईला विचारण्यात आला. त्यावर हे संमद खोटं आहे. काहीही खरं नाही. तो पूजाबद्दल आमच्याशी कधीच बोलला नाही, असं त्याची आई म्हणाली. अरुण बेकसूर आहे. त्याला या प्रकरणात गोवलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला. अरुण कुठे आहे? असा सवाल केल्यावर आम्हाला माहीत नाही तो कुठे आहे? त्याच्याशी काही बोलणंही झालं नाही, असं त्या म्हणाल्या. यावेळी अरुणच्या आईची मनस्थिती ठिक नसल्याचं दिसून आलं.
 
अरुण राठोड हा वनमंत्री संजय राठोड यांचा कार्यकर्ता आहे. तो संजय राठोड यांच्या अत्यंत जवळचा असून राठोड यांच्या सर्व खासगी गोष्टी अरुणला माहीत असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. संजय राठोड यांच्या घरी, कार्यालयात आणि मंत्रालयातही अरुणचा मुक्त संचार असल्याने तो मंत्र्याचा किती जवळचा आहे. अरुण हा बीड जिल्ह्यातील परळीच्या दारावती तांडा येथील रहिवासी आहे. तो पुण्यात पूजा सोबत राहत होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे : इराणी चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले