Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता

विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता
मुंबई , मंगळवार, 6 जुलै 2021 (23:53 IST)
वादळी ठरलेलं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. मात्र, चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनात रखडली गेली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे.
 
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. मागील अधिवेशन अध्यक्षविनाच पार पडले. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी अशी मागणी पुढे आली. परंतु, पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. हिवाळी अधिवेशन पूर्वी विशेष अधिवेशन घेऊन विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणार, अशी माहिती सूत्रांनी दिली. अध्यक्षपदाची निवडणूक न घेतल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री ठाकरे अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायला तयार नाहीत, अशी माहिती समोर आली होती आणि झालंही तसंच आहे. तसंच, महाविकास आघाडीचे नऊ आमदार अधिवेशनात गैरहजर होते. त्यामुळेही हा निर्णय टाळण्यात आला.
 
विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या पूर्वीच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली होती. या बैठकीत भाजपचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपद भरण्यात यावे, असं पत्र ठाकरे सरकारला पाठवले होते. पण, राज्यपाल भाजपची मागणी लावून धरत दबाव आणत आहे. त्यामुळे राज्यपालांचा हा निर्णय डावलण्यात यावा, असा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई काँग्रेसला धक्का; कृपाशंकर सिंह उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार