राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेश होईपर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मे महिन्यात घेणं बंधनकारक असलेली ग्रामसभा यंदा होणार नाहीत.
याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मात्र राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच आणि उपसरपंच पदांच्या निवडीसाठी आवश्यक असलेली, ग्रामपंचायतीची बैठक घ्यायला संमती दिली आहे.
या बैठका सर्व आवश्यक सूचनांचं पालन करुन घ्याव्यात, अशा सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं.