Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात महापलिका आणि इतर ठिकाणी आघाडी नाही: पटेल

राज्यात महापलिका आणि इतर ठिकाणी आघाडी नाही: पटेल
दहा महापालिकांत काँग्रेस राष्ट्रवादीत आघाडी होणार नाही असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटल आहे. त्यामुळे आता कुठेही आघाडी होणार नाही हे उघड झाले असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार आहेत. नगरपरिषदा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. आता महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने कंबर कसलीये.
 
आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे .  मुंबई महापालिकेसाठीच्या सर्व जागा राष्ट्रवादी जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पटेल यांच्या वक्तव्यामुळे राज्यात ज्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती. त्या सुद्धा थांबणार असून येत्या तीन दिवसात अनके ठिकाणच्या इच्छुकांच्या उमेदवारी याद्या प्रसिद्ध होणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कालिदास नाट्यमंदिर नाट्य : मनसे मुळे दामले नरमले