राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सध्या चर्चा सुरु आहे. ही अफवा नसून वस्तुस्थिती असल्याचा खळबळजनक दावा राज्याचे परिवहनमंत्री प्रतापसरनाईक यांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा चर्चा सुरु होत्या. अजित दादा असतानांच दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येणार अशी चर्चा सुरु होती. अजित दादांच्या अकाली निधनांनंतर आता पुन्हा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण आले असून सुरुवातीला या चर्चांना नकार देणारे नेते देखील यावर भाष्य करू लागले आहे.
सरनाईक यांच्या मते, ही प्रक्रिया पूर्ण झाली असती तर राज्याच्या राजकारणात एक वेगळे चित्र दिसले असते. मात्र, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. तरीही, “सत्य लपून राहत नाही,” असे ते म्हणाले.