Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हा तर रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष : दरेकर

हा तर रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष : दरेकर
, सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (22:59 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला  गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही आहे. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष असल्याचा हल्लाबोल भाजप नेते प्रवीण दरेकर  यांनी केला आहे. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा घणाघात दरेकर यांनी केला. पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावरुन भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला टोला लगावला आहे.
 
भाजपच्या  एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात कमळ आहे. कुऱ्हाड हि अन्याय अत्याचाराच्या विरोधात उघारली जाते, राज्यात जिथे जिथे महिला अत्याचार होईल तिथे-तिथे हातात कुऱ्हाड घेणार असल्याचं प्रविण दरेकर यांनी यावेळी म्हटलंय
राज्यात होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात भाजपाने कुऱ्हाड हातात घेतली आहे. आता आयऱ्या गयऱ्यांच्या भीतीला घाबरायचे नाही. यांची सत्ता म्हणजे आढवावरचे पाणी, रात्री पण महिती नसतं सकाळी राहिलं का..! तीन पक्ष सरकारमध्ये एकत्र आहेत. मात्र रोज एकमेकांचे कपडे काढायचे काम करतात असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जनसंसद शक्तिशाली करा की, सरकार पडेल, देशाला वाचवण्याचा दुसारा रस्ता नाही