गरोदर महिलेला झोळीतून रुग्णालयातनाशिकमधील मनाला चटका लावणारं दृश्यनाशिकच्या हत्तीपाड्यात रस्ता उपलब्ध नसल्यामुळेउपचारासाठी रुग्णांना पिशवीत घेऊन जावे लागते. देशाल स्वतंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र, 75 वर्षांनंतरही इथल्या अनेक नागरिकांना अगदी मुलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचं चित्र अनेकदा समोर आले आहेत. तसेच एक बातमी नाशिकच्या हत्तीपाडा येथे रस्ताच नसल्याने रुग्णांना उपचारासाठी चक्क झोळीमध्ये न्यावं लागत असल्याची परिस्थिती आहे. एका गरोदर महिलेला येण्यासाठी कुटुंबीयांनी ब्लँकेटची झोळी केली आहे आणि ते यातूनच महिलेला रुग्णालयात घेऊन जात आहेत.