Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून प्राथमिक चौकशी

rohit panwar
, रविवार, 28 ऑगस्ट 2022 (10:18 IST)
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. यावरच आता रोहित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
 
ते म्हणाले आहेत की, ''मी दिवसभर सृजन भजन स्पर्धेच्या नियोजन होतो. मीडियाच्या माध्यमातून चौकशीचा मुद्दा कळला.'' ते म्हणाले, मी आधीही केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केलं आहे. आताही करणार.
ईडी चौकशीबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले आहेत की, ''जे सांगण्यात आलं आहे, ते कुणी सांगितलं? ती बातमी कोणी दिली? काय ती बातमी आहे? याबाबत काय कागद आहेत, हे मी पाहिलेलं नाही. हे मला बघावं लागेल आणि बघितल्यानंतर नक्कीच मी याबाबत बोलेल.''
 
ते म्हणाले की, ''जर मला बोलवलं, तर मी आधीही सहकार्य केलं आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेकवेळा केंद्रीय यंत्रणांनी मला, माझ्या अधिकाऱ्यांना बोलावलं आहे. सत्तेत येण्याच्या पाच वर्ष आधीही देखील सीआयडी आणि इतर संस्थांनी माझी आणि माझ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. त्यावेळी जसं सहकार्य केलं, तसेच मी यावेळी ही करेन.''

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्यानं कॅन्सर होऊ शकतो का?