Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकायुक्तसाठी चौथ्या उपोषणाचीही तयारी पण…अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

anna hajare
, बुधवार, 18 मे 2022 (08:12 IST)
यापूर्वी लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी तीन वेळा उपोषणे झाली आहेत. जनहितासाठी लोकायुक्त कायद्यासाठी आता चौथे उपोषण करण्याचीही तयारी आहे. मात्र, तशी वेळ येवू नये अशी विनंती आहे.

८५ वर्षांच्या वयात उपोषणाची वेळ येणार नाही हीच इच्छा,’ असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले आहे.लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
लोकायुक्त कायद्याच्या मसुद्याचा आतापर्यंत झालेला त्यांनी सांगितला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आपण उपोषण केले होते. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर ते मिटले.

त्यानुसार समिती नियुक्त करून कामकाज सुरू झाले. पुढे फडणवीस यांचे सरकार जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले. त्यावेळी मागील सरकारने आणि आपणही ठाकरे यांनी या कायद्याचा आतापर्यंत झालेला प्रवास सांगितला होता.
त्यावर पुढे काम करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, पुढे काहीच झाले नाही. आता एक दोन बैठकांसाठी हे काम रखडले आहे. त्या घेण्यात याव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यसभेसाठी संभाजीराजेंना शरद पवारांचा पाठिंबा, विजयाचा मार्ग मोकळा?