Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या भूमीचे नक्कीच खास वैशिष्ट्ये जे मला वारंवार खेचून आणते : राष्ट्रपती

या भूमीचे नक्कीच खास वैशिष्ट्ये जे मला वारंवार खेचून आणते :  राष्ट्रपती
, शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (15:28 IST)
महाराष्ट्राची जनता आणि या भूमीचे नक्कीच खास वैशिष्ट्ये जे मला वारंवार याठिकाणी खेचून आणते. गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतीबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांसारख्या अनेक महान व्यक्तींमध्ये राज्याच्या महानतेचा विशाल प्रवाह दिसून येतो, असंही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणालेत. मुंबईतल्या राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
 
जर महाराष्ट्राच्या जनतेला राज्याच्या नावाची उत्पत्ती किंवा अर्थ विचारला तर भाषाशास्त्र किंवा इतिहासाच्या संदर्भाची आवश्यकता नाही. थेट तुमच्या ह्रदयातून उत्तर द्याल. आमचा महाराष्ट्र म्हणजेच भारतातील एक महान राज्य, असंही रामनाथ कोविंद म्हणाले. महाराष्ट्र आध्यात्मिक भूमी आहे तसेच अन्यायाविरुद्ध शौर्याने लढणारी आहे. देशभक्तांची भूमी आहे तसेच भागवत भक्तांची भूमी आहे. महाराष्ट्र राज्य देशाचे प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. यावेळच्या दौऱ्यात माझ्या मनात शून्यतेची भावना निर्माण झाली, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राला प्रतिभा आणि निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथील आदरातिथ्य प्रसिद्ध आहे. यामुळे केवळ मलाच नाही तर देश-विदेशातील असंख्य लोकांना पुन्हा-पुन्हा महाराष्ट्रात यावे वाटते. लतादीदींचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे, अशी भावनाही रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.
 
महाराष्ट्राची जनता आणि या भूमीचे नक्कीच खास वैशिष्ट्ये जे मला वारंवार याठिकाणी खेचून आणते. गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतीबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांसारख्या अनेक महान व्यक्तींमध्ये राज्याच्या महानतेचा विशाल प्रवाह दिसून येतो, असंही ते म्हणालेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जनतेनी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्धव ठाकरेंना ठेका दिला का? सोमय्या यांचा सवाल