Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डिजिटल करन्सीला नोटांच्या छापखान्यातील प्रेस कामगारांचा विरोध

डिजिटल करन्सीला नोटांच्या छापखान्यातील प्रेस कामगारांचा विरोध
, शनिवार, 24 डिसेंबर 2022 (20:41 IST)
संपूर्ण देशातील निवडक करन्सी छपाई करत असलेल्या प्रेस पैकी एक असलेल्या नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या  नोटांच्या छापखान्यातील प्रेस कामगारांनी डिजिटल करन्सी चे धोके लक्षात घेऊन डिजिटल करन्सीच्या व्यवहाराला  विरोध दर्शवला आहे. ‘डिजिटल करन्सीमुळे देशाची अर्थव्यवस्था,सुरक्षा तसेच बॅंकींग आणि नोट प्रेस क्षेत्रातील रोजगार धोक्यात येणार आहे.सायबर हल्ले आणि सायबर क्राइम वाढून नागरिकांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे डिजिटल करन्सीला विरोध करण्यासाठी देशभरात व्यापक जनजागृती केली जाईल’ अशी माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली आहे.
 
देशात नाशिकरोड, देवास (मध्यप्रदेश), सालबोनी (पश्चिम बंगाल), म्हैसूर (कर्नाटक) येथे चलनी नोटांची छपाई होते. ऑनलाईन व्यवहारामुळे नोटांचा वापर कमी होत असून नोटांच्या प्रेसवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. डिजिटल करन्सीचे फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहे. क्रिप्टो करन्सी वर कोणाचे नियंत्रण नाही. भारतात ७० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. देशात तज्ञ सायबर पोलिसांची टंचाई आहे. देशात सायबर सिक्युरिटीचे जाळ मजूबत नाही. याचा गैरफायदा चीन, पाकसारखे शत्रू देश घेऊन सायबर हल्ल्या द्वारे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करू शकतात. तसेच ही करन्सी भविष्यात घातक ठरू शकते. सरकारने डिजीटल आणि क्रिप्टोचे परिणाम आधी तपासावेत,’ अशी मागणी प्रेस कर्मचाऱ्यांनी केली आहे. डिजिटल करन्सीमुळे भारतातील रोजगार धोक्यात येणार असून प्रेस कामगारांचे नुकसान होणार आहे त्यामुळे डिजिटल करन्सीला त्यांनी विरोध दर्शविला असल्याची  भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
 
केंद्र सरकारने एक नोव्हेंबरपासून सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सी बी डी सी) अर्थात डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट देशातील चार महानगरांत सुरू करून संपूर्ण नोटबंदीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. या नव्या प्रणालीचे बँक अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही सुरू झाले आहे. मात्र, रोजगार गमावण्याच्या भीतीपोटी नोट प्रेस मधील कर्मचाऱ्यांनी या प्रणालीला विरोध केला आहे. त्यामुळेच डिजिटल रुपीला विरोध करण्यासाठी देशव्यापी मोहीम उघडली जाणार आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे आणि जेमसन धोनीसोबत खेळतील, चेन्नईची संपूर्ण टीम जाणून घ्या