पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या यवतमाळच्या दौऱ्यावर आहे. यवतमाळच्या जवळ भारी शिवारात महिला मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी ते येणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि महाराष्ट्राचे सम्पूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या जवळपास दोन लाखांवर महिला या सभेस उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास पंतप्रधानांची सभा होणार आहे. येथून ते शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये पाठवतील. तसेच पंतप्रधान मोदी पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृतिस्थळाचे लोकार्पण, वर्धा- कळंब रेल्वेचे लोकार्पण देखील करणार आहे.