Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात मॉरिशसला भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात मॉरिशसला भेट देणार
, शनिवार, 22 फेब्रुवारी 2025 (15:36 IST)
Prime Minister Narendra Modi News : पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात मॉरिशसला भेट देणार आहे. तसेच राष्ट्रीय दिनाच्या समारंभात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निवडण्यात आले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान यांनी मोदींना कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात मॉरिशसला भेट देणार असून त्यांना राष्ट्रीय दिनाच्या समारंभात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निवडण्यात आले आहे. मॉरिशसचे पंतप्रधान यांनी स्वतः याची घोषणा केली आहे.तसेच मॉरिशसचे पंतप्रधान यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सभेला संबोधित करताना म्हटले की, "पंतप्रधान मोदींच्या इतक्या व्यस्त वेळापत्रकानंतरही, आपल्याला अशा एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचे आतिथ्य करण्याची संधी मिळणे हे आपल्या देशासाठी खरोखरच एक विशेष सन्मान आहे."
प्रत्येकवर्षी  १२ मार्च रोजी मॉरिशस आपला राष्ट्रीय दिन साजरा करतो. १२ मार्च १९६८ रोजी ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले होते. 
ALSO READ: मुंबईतील मरीन लाईन्स येथील इमारतीला भीषण आग
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अण्णा हजारे यांची आदमी पक्षाच्या पराभवावर प्रतिक्रिया