DD India
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील वर्धा येथे राष्ट्रीय 'पीएम विश्वकर्मा कार्यक्रम प्रदर्शना'दरम्यान भगवान जगन्नाथाची मूर्ती खरेदी केली. विशेष म्हणजे पीएम मोदींनी डिजिटल पेमेंटद्वारे खरेदी केली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
पीएम मोदी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केल्यानंतर 'पीएम विश्वकर्मा कार्यक्रम प्रदर्शनी'मध्ये गेले असताना कारागिरांनी पंत प्रधान मोदींशी संवाद साधला . ता वेळी मोदींनी एका कारागिराकडून भगवान जगन्नाथ यांची कलाकृती युपीआय पेमेंट करून विकत घेतली . याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ मध्ये दिसत आहे की, मोदी कारागिराला विचारात आहे की मी तुमच्याकडून काय खरेदी करू? कारागार त्यांना भगवान जगन्नाथाची मूर्ती खरेदी करण्यास सांगतो. मूर्ती खरेदी केल्यावर पंतप्रधान मोदी कारागिरांचे युपीआय द्वारे पेमेंट करतात आणि त्याला पैसे आले का असे विचारतात. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स त्यांचे कौतुक करत आहे.