Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पैसे आणि दागिन्यांसाठी लोभापोटी निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने केली प्रियसीची हत्या

पैसे आणि दागिन्यांसाठी लोभापोटी निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने केली प्रियसीची हत्या
, गुरूवार, 12 डिसेंबर 2024 (09:14 IST)
Nagpur News: महाराष्ट्रातील चिमूर येथील बेपत्ता महिला हिच्या हत्येप्रकरणी नागपूर पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. चंद्रपूरचे निलंबित पोलीस शिपाई नरेश उर्फ ​​नरेंद्र पांडुरंग डाहुले यांनी पूर्ण नियोजन करून हा गुन्हा केला.
मिळालेली माहितीनुसार चिमूर येथून बेपत्ता झालेल्या या महिलेची हत्या करणारा चंद्रपूरचा निलंबीत पोलीस शिपाई नरेश उर्फ ​​नरेंद्र पांडुरंग डाहुळे याने संपूर्ण नियोजन करून हा गुन्हा घडवून आणला. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. सुरुवातीच्या तपासात त्याने घरातून पळून जाण्याच्या वादाची माहिती पोलिसांना दिली होती. पण आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. नरेंद्र याने प्रियसीला मारण्याची योजना आधीच आखली होती. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी या पोलिसाने प्रियसीला घरातून पळून जाण्यास सांगितले. तसेच पैसे आणि दागिने सोबत आणण्यास सांगितले होते. 26 नोव्हेंबरला प्रियसी बसने नागपूरला पोहोचली आणि गांधीबागमध्ये नरेंद्रला भेटली. नरेंद्र तिला गाडीतून रेशीमबाग येथे घेऊन गेला. पैसे आणि दागिन्यांची विचारणा केली. प्रियसीने रिकाम्या हाताने घर सोडल्याची माहिती दिली. हे ऐकून त्याला राग अनावर झाला. यानंतर तो प्रियसीला शिवीगाळ करू लागला. वादानंतर नरेंद्रने प्रियसीचा गळा आवळून हत्या केली.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमरावतीत चालत्या बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू