Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभ्यास, अभ्यास ... दहावी , बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

maharashatra board
, सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (21:03 IST)
राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 2मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाने दहावी -बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडणार. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली. 
 
परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीच्या बोर्ड परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. या    परीक्षेचा वेळा शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. 
 
विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी तारखेची खात्री करून त्यात हरकत असल्यास लेखी स्वरूपात मंडळाकडे 15 दिवसांच्या आत पाठवावे. तसेच व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. 
 
 हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने फेब्रुवारी मार्च 2023 च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओबीसींच २७ टक्के आरक्षण कायम राहण्यासाठी लढा सुरु राहील – छगन भुजबळ