Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत आजपासून 11 जूनपर्यंत जमावबंदी लागू

mumbai police
, सोमवार, 29 मे 2023 (21:16 IST)
मुंबईत घातपाताची शक्यता असल्याची माहिती गुप्त खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने 28 मे ते 11 जून पर्यंत मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हा आदेश काढला आहे.
 
मुंबई पोलिसांनी यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबईतील सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा काही घटना घडवण्याची शक्यता गुप्त खबऱ्यांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने 28 मे ते 11 जून पर्यंत संपूर्ण शहरात जमावबंदी असेल. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती बेकायदेशीररित्या एकत्र येण्यावर प्रतिबंध असेल.
 
दरम्यान, लग्न समारंभ, शोकसमारंभ, कोऑपरेटिव्ह सोसायटय़ा, विविध संस्थाचे कार्यक्रम, चित्रपटगृह, नाटय़गृह, दुकाने, व्यवसायाची ठिकाणं यांना या आदेशातून वगळण्यात आलं आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तर कसब्याप्रमाणे लोकसभेची पोटनिवडणूकही जिंकता येईल-संजय राऊत