Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिथावणीखोर ‘हिंदुस्थानी भाऊ’ला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

jail
, बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (08:15 IST)
विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानाबाबत न्यायालयात बिनशर्त माफी मागण्यात आल्याचं वकील अ‍ॅड. महेश मुळ्येंनी सांगितलं. याबाबत अधिक चौकशी करण्यासाठी हिंदुस्थानी भाऊला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षांच्या निर्णयाविरोधात मुंबईतील धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घालत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने या संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे हे आंदोलन उभे राहिल्याचे समोर आल्यानंतर धारावी पोलीस ठाण्यात हिंदुस्थानी भाऊ आणि इकरार खान वखान खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात हिंदुस्थानी भाऊ आणि इकरार खानला अटक करण्यात आली. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
 
दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने एबीपी माझाशी बोलताना काल सांगितलं होतं. गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉकएक्सप्रेस आणि माल गाड्या रद्द