Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहिल्यादांच पीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजीचा वापर

पहिल्यादांच पीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजीचा वापर
, शुक्रवार, 28 जून 2019 (17:51 IST)
पुण्यात  पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत पीटीझेड कॅमेरा टेक्नॉलॉजीचा वापर करुन गेल्या दोन दिवसात काही सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.  देशात सर्वप्रथम वापर सध्या पालखी सोहळ्यात करण्यात आला आहे.
 
यामध्ये  ठिकाणी मोठी गर्दी असेल, अशा ठिकाणी ही पोलीस व्हॅन नेल्यास कॅमेरा गर्दीवरुन फिरु लागतो़. त्या गर्दीत जर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असेल तर इतक्या गर्दीतही हा कॅमेरा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला टिपतो व त्याची सुचना व्हॅनमध्ये असलेल्या पोलिसांना स्किनवर दिली जाते. व्हॅनमधील पोलीस या गुन्हेगाराचे लोकेशन व त्याचे वर्ण जवळच्या पोलिसांना तातडीने कळवितात. गुन्हेगाराचे वर्णन, त्याचा फोटो व गर्दीत त्याचे लोकेशन मिळाल्याने पोलीस इतक्या गदीर्तूनही त्याला नेमके शोधून काढू शकतात. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या बुधवारी पुण्यात आल्या़ .या पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती़. पालख्यांबरोबर चालणारे काही लाख वारकरी, नागरिक यांच्या बरोबरच पोलिसांच्या अशा दोन व्हॅन फिरत होत्या आणि गर्दीत मिसळून असणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होती़ त्यातून काही गुन्हेगार पोलिसांच्या हाताशी लागले आहेत़.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सायकलवारी अपघात : मरावे परी देह रुपी उरावे