शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ आज (26 मार्च) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात धडाडणार आहे. मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून मागील दोन दिवसात राजकीय वातावरण तापलं असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून दादा भुसे हे निवडून आले आहेत. सध्या ते नाशिकचे पालकमंत्री असून एक मंत्रीपदाचा कार्यभार देखील ते सांभाळत आहेत.
मात्र शिवसेना फुटल्यानंतर ते बाहेर पडले आणि शिवसेना शिंदे गटात गेल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट एकाकी पडला होता.
अशातच मालेगावमधून भाजपचे अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत भाजपसह शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का दिला. याच पार्श्वभूमीवर मालेगाव तालुक्यासह परिसरात शिवसेना ठाकरे गट संपर्क वाढवण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा असल्याचे सांगितले जात आहे.
Published By - Priya Dixit