Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवजात अर्भकाची खरेदी विक्री करणार्‍या टोळीला अटक

नवजात अर्भकाची खरेदी विक्री करणार्‍या टोळीला अटक
पुण्यामध्ये नवजात अर्भकाची खरेदी विक्री करणा-या टोळी पकडण्यात  पोलिसांना यश आलं आहे. तान्हुल्याला विकताना पुणे पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे.अवघ्या एक महिन्याच्या या अर्भकाची ही टोळी तब्बल तीन लाख रुपयांना विक्री करत होते. पोलीसाना एका गुप्त माहिती देणारयाने हा पराक्र सांगितला होता मग लगेच पोलीस सक्रीय झाले आणि त्यांनी सपळा रचला आणि त्यांना पकडले पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

काही महिन्यांपूर्वीही पिंपरीमध्येही असाच प्रकार समोर आला होता. त्यामुळे पुण्यात सरोगेट मदरच्या माध्यमातून बाळांची विक्री करणारे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दिप्ती संजय खरात (वय 30, रा. सिंहगड रोड, खडकवासला), लतिका सोमनाथ पाटील (वय 23, रा. डोबिंवली इस्ट, ठाणे), आशा नाना अहिरे (वय 27, रा. उल्हासनगर, ठाणे) व केशव शंकर धेंडे (वय 42, रा. तरवडेवस्ती, हडपसर), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिप्ती खरात ही सरोगेट मदर एजंट आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अण्णा हजारेंच्या निषेधार्थ पुतळ्याचे दहन