पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ लक्झरी बसचा अपघात झाला आहे. अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आह तर या भीषण अपघातात सुमारे 13 जण जखमी झाले आहेत.
ही बस हैदराबादवरुन मुंबईला येणाऱ्या लक्झरी बसला आज सकाळी पाच वाजता अपघात झाला आहे. हा अपघात इंदापूरजवळील पायल धाबा परिसरात झाला आहे. एम्पायर ट्रॅव्हल्सची ही बस असून जखमींवर इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या लक्झरी बसचा अपघात कसा झाला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही, तसंच अपघातातील मृतांची ओळखही पटलेली नाही.तर अपघात कसा झाला कोणाची चूक होती याची चौकशी पोलिस करत आहे.