पुण्यातल्या खडकी येथे एका विद्यार्थ्याने आवडत्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने आत्महत्या केली आहे. हर्षवर्धनसिंग राघव (२२) असे तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. हर्षवर्धनसिंग मुळचा छत्तीसगडचा राहणारा होता. मागील दोन वर्षांपासून तो शिक्षणासाठी पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या हॉस्टेलमधे राहत होता.
शनिवार आणि रविवार या दोन सुट्टीच्या दिवशी हडपसरला नातेवाईकांच्या फ्लॅटमध्ये रहायला जायचा. हर्षवर्धनसिंग पुण्यात असला तरी छत्तीसगडमधील त्याच्या घरी असलेल्या कुत्र्याबद्दल त्याचा लळा कायम होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याच्या बोस्की नावाच्या कुत्र्याचा मृत्यू झाला होता.