Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चंद्रपूर जिल्‍हयातील अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारणार

चंद्रपूर जिल्‍हयातील अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारणार
, गुरूवार, 6 एप्रिल 2017 (22:06 IST)
पंजाब नॅशनल बँकेतर्फे स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्‍ट या संस्‍थेमार्फत संचालित शेतकरी प्रशिक्षण केंद्राकरिता चंद्रपूर जिल्‍हयातील अजयपूर येथील 4.34 हे.आर जमीन मंजूर करण्‍याचा निर्णय राज्‍य मंत्रीमंडळाच्‍या 6 एप्रिल 2017 रोजी झालेल्‍या बैठकीत घेण्‍यात आला आहे. वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने अजयपूर येथे सर्व आधुनिक सोयी सुविधायुक्‍त असे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्‍यात येणार आहे.

शेतकरी, ग्रामीण युवक आणि महिला यांचा कौशल्‍य विकास घडवून आणि सामाजिक, आर्थीक क्रियाकलापांच्‍या माध्‍यमातुन त्‍यांचे अधिकाधीक कल्‍याण साधण्‍याच्‍या उद्देशाने पंजाब नॅशनल बँकेने पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्‍ट ही संस्‍था स्‍थापित केली आहे. या संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन देशातील विविध 11 ठिकाणी शेतकरी प्रशिक्षण केंद्रांची स्‍थापना करण्‍यात आलेली असुन या केंद्रात कौशल्‍य विकास आणि स्‍वयंरोजगाराच्‍या माध्‍यमातुन दारिद्रय निर्मुलन व्‍हावे यादृष्‍टीने शेतकरी, ग्रामीण युवक व महिलांना निवासी व्‍यवस्‍थेसह विना‍मुल्‍य प्रशिक्षण पुरविण्‍यात येते.

वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंजाब नॅशनल बँकेच्‍या उच्‍चाधिका-यांशी चर्चा करून चंद्रपूर जिल्‍हयात अजयपूर येथे सदर प्रशिक्षण केंद्र सुरू करण्‍याची मागणी केली. त्‍यांच्‍या मागणीला प्रतिसाद देत पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्‍ट च्‍या माध्‍यमातुन अजयपूर येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. या केंद्रासाठी अजयपूर येथील 8 ते 10 एकर जागा उपलब्‍ध करून देण्‍याबाबत पी.एन.बी. फार्मर्स वेलफेअर ट्रस्‍टने केलेल्‍या विनंतीच्‍या अनुषंगाने राज्‍य मंत्रीमंडळाने मान्‍यता दिली आहे. अजयपूर येथील सवर्हे नं. 26, 27 व 312 एकुण आराजी 5.58 हे. आर पैकी 4.34 हे. आर शासकीय जमीन या प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्‍यात आली आहे. शासनाला प्राप्‍त अधिकारानुसार 30 वर्षासाठी वार्षीक नाममात्र रू. 1 दराने भुईभाडे आकारारून नियमित अटी व शर्तीवर भाडे पट्टयाने जमीन देण्‍यात यावी व सदर भाडे पट्टयाचे त्‍याच तत्‍वावर नुतनीकरण करण्‍याची तरतूद भाडे पट्टयात अंतभुर्त करण्‍यात यावी असा निर्णय राज्‍य  मंत्रीमंडळाने घेतला आहे.

या शेतकरी प्रशिक्षण केंद्रात एक निवासी कक्ष, तीन वर्गखोल्‍या, दोन संगणक कक्ष, एक ट्रॅक्‍टर दुरूस्‍ती कार्यशाळा, एक कार्यालय, एक संचालन कक्ष, एक वाचनालय, एक मनोरंजन कक्ष, एक स्‍वयंपाकघर, एक भोजन कक्ष, एक माती परीक्षण प्रयोगशाळा, एक ट्रॅक्‍टर कार्यशाळा, एक शेती उपकरणांसाठी साठवण कक्ष, मोबाईल व्‍हॅन, जीप यांच्‍या दोन गॅरेज, एक अतिथी कक्ष, बैठया खेळांसाठी एक कक्ष असे शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे स्‍वरूप राहणार आहे. या केंद्रात पॉलीहाऊस, फळबाग, पुष्‍प संवर्धन या कार्यक्रमांसह गांडूळ खत, मधमाशी संगोपन, अळंबी शेती, मत्‍स्‍यतळे, सुगंधी औषधी वनस्‍पती लागवड, भाज्‍या मशागत आदी प्रात्‍याक्षीके करण्‍यात येणार आहे. कर्ज, ठेवी बाबतच्‍या योजना, आर्थिक समावेशनाबाबत जागरूकता निर्माण करणे आदी उपक्रमांवर या केंद्राच्‍या माध्‍यमातुन भर देण्‍यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोस्टन शहरात सायकल शेअरिंग अभिनव उपक्रम