Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कोल्हापुरात संविधान वाचवा परिषद घेणार

rahul gandhi
, शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (08:48 IST)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. सर्वप्रथम ते सकाळी राजर्षी शाहू समाधीस्थळाला भेट देतील, त्यानंतर ते कोल्हापूरला भेट देतील. येथे बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासोबतच संविधान सन्मान परिषदेलाही ते उपस्थित राहणार आहे. या सभेत एक हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार असून, सर्वधर्मीय लोकांसह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही यात सहभागी होणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार हरियाणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला आहे. हरियाणातील 90 जागांवर आज मतदान होणार आहे. हरियाणानंतर आता राहुल गांधींनी मिशन महाराष्ट्राची तयारी सुरू केली आहे. या वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकाही होणार आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याने काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचीही सुरुवात होईल, असे मानले जात आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PM Modi आज महाराष्ट्र दौऱ्यावर, अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार