Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लवासा , मुंबई, गोव्यासह ९ ठिकाणी छापे

लवासा , मुंबई, गोव्यासह ९ ठिकाणी छापे
, रविवार, 24 मार्च 2024 (10:43 IST)
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी संबंधित असलेला पुण्यातील लवासा प्रकल्प बुडाला होता. हा प्रकल्प अजय सिंह यांच्या डार्विन कंपनीने तब्बल १८०० कोटी रुपये मोजून विकत घेतला होता. आता ही कंपनी आणि संबंधित कंपन्या ईडीच्या रडारवर आल्या असून दिल्ली, मुंबई, गोव्यात अशा नऊ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत ८० लाख रुपयांची रोख आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
 
ईडीने डलेमन रिया-आयटी ट्रेड लिमिटेड या कंपनीवर छापे मारले आहेत. ही कंपनी कायदेशीर, ऑडिटिंग आणि कर सल्लागार क्षेत्रात काम करते. अजय सिंह आणि त्याच्या साथीदारांच्या ठिकाण्यांहून ७८ लाख रुपये भारतीय चलन, २ लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले. हरिप्रसाद अकालू पासवान आणि रमेश यादव कुमार हे या कंपनीचे संचालक असून ती लवासा विकत घेतलेल्या डार्विन कंपनीचे मालक अजय स्ािंह यांच्या नियंत्रणात आहे.
 
डलेमन आणि इतरांनी वेस्टिज मार्केटिंग कंपनीच्या बँक खात्यातून फसवणूक करत १८ कोटी रुपयांची रक्कम वळती केल्याचा आरोप आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रकाश आंबेडकरांचा शाहू महाराजांना पाठिंबा