Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 11 April 2025
webdunia

राज्यात लवकरच वेग घेणार मान्सून

Maharashtra weather report
राज्यात मान्सून चांगलाच रखडलेला असून मात्र आता लवकरच वेग घेणार असल्याची माहिती आहे. हवामान खात्याकडून देण्यात येत असलेल्या माहितीनुसार पुढच्या वाटचालीसाठी मोसमी वाऱ्यांच्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळ पुढे सरकल्याने आता मान्सूनचा मार्ग मोकळा झाला असून राज्यात पुढच्या 2 दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल. हवामान खात्याकडून असा इशारा देण्यात आला आहे.
 
भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी या संबंधी ट्वीट करत माहिती दिली आहे की 23 जूनपासून कोकणातील काही भागात तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर त्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
हवामान खात्याप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भात आज उद्यानंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 
 
तर 25 जून नंतर सगळीकडे चांगल्या पावसाळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'ते गोळ्या घालू शकतात किंवा तुरुंगात टाकू शकतात', ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी केल्याबद्दल संजय राऊत संतापले