Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कसं असेल महाराष्ट्रातील हवामान

कसं असेल महाराष्ट्रातील हवामान
, बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (17:44 IST)
राज्यात सर्वदूर कोरडं हवामान राहणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे भारतात मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत.
 
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रभावामुळे दक्षिण भारत आणि ईशान्यकडील काही राज्यात अद्याप मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. पुढील एक ते दोन दिवसांत येथून मान्सून पूर्णपणे परतण्याची शक्यता आहे.
 
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग वगळता महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. स्थिती बिकट आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.
 
भारतीय हवामान खात्याने राज्यात सर्वदूर कोणताही इशारा दिला नाही. मान्सून परत जाताच राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात किंचितशी वाढ झाली आहे.
 
तर पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. दुसरीकडे, दक्षिण भारत आणि ईशान्यकडील राज्यात आज अनेक ठिकाणी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. येत्या चोवीस तासांत याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
 
खरंतर, सध्या बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा परिसरावर तयार झालेलं हवेच्या कमी दाब क्षेत्र बिहारकडे सरकलं आहे. तर उत्तर प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर भारतातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Actress Molested In Flight: दिल्लीहून मुंबईला जात असताना अभिनेत्रीचा विनयभंग, गाझियाबादच्या व्यावसायिकाला अटक