Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rain Update: राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता, या विभागांना ऑरेंज अलर्ट

Rain Update: राज्यात अति मुसळधार पावसाची शक्यता, या विभागांना ऑरेंज अलर्ट
, शुक्रवार, 30 जून 2023 (11:15 IST)
राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून पावसाने जोर धरला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार मेघसरी कोसळत आहे. मुंबई आणि लगतच्या भागात गुरुवार सकाळ पासून पाऊस सुरु आहे. येत्या काही तासात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढील दोन ते तीन दिवस पालघर ,रायगड, ठाणे आणि रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. या भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.  

कोल्हापूर जळगाव, सिंधुदुर्ग नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आले असून येत्या दोन ते तीन दिवसांत या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. 

नागरिकांना आवश्यक असल्यास घरात बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत सकाळपासून पाऊस सुरू आहे .दादर , माहीम , वरळी , भायखळा परिसरात पाऊस सुरू.मुंबईसह उपनगरात सुद्धा सकाळपासून पाऊस सुरूच आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जळगाव : पोलीस पथकावर काळाचा घाला, दोघांचा जागीच मृत्यू