राज्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा पिकांचे नुकसान झाले आहे. आधीच नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले. गहू ,पपई ,टरबूज, कांदा,लिंबू, आणि भाजीपाल्यांचे खूप नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील पातूर ,अकोला,बार्शीटाकळी, मूर्तिजापूर,बाळापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे.
हवामान खात्यानं विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे राज्यातील काही भागात पावसांसह गारपीट झाली. गारपीटांमुळे जनावरे दगावली असून काही घरांना नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे अकोला तालुक्यात लोणाग्रा येथे अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे.