ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र, पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली. मात्र, गणरायाचं आगमन होताच, राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात येत्या गुरुवार पासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसे कोकण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, लातूर, परभणी, उस्मानाबाद, चंद्रपूर, नाशिक, यवतमाळ, बुलडाणा आणि हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.