Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
, सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (08:54 IST)
राज्यातील अनेक ठिकाणी थंडीची चाहुल लागणार असताना आता पावसाचं पुन्हा एकदा संकट ओढवलं आहे. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. 
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1 ते 3 नोव्हेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा सांगली जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोलापुरात 3 नोव्हेंबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 
१ - २ नोव्हेंबरला राज्यात दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जने सह पावसाची शक्यता आहे. 3 नोव्हेंबरला नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
 4 ते 10 नोव्हेंबर एक कमी दाबाचे क्षेत्र द-पू बंगालच्या उपसागरात तयार होत असून ते जास्त तीव्र न होता पश्चिमेच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. 6-11 नोव्हेंबर दरम्यान ह्याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा दक्षिण भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो. महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात १ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित