सध्या देशात सर्वत्र उकाडा सुरु आहे. महाराष्ट्रात काही भागात पाऊस कोसळत आहे. तर काही भागात प्रचंड उकाडा आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. गेल्या दोन दिवांपासून तापमान 40 च्या पुढे गेलं आहे. सर्वाधिक तापमान जळगावचे नोंद केले गेले. मुंबईत पण नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात आज मंगळवार रोजी बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पासून 5 दिवस अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून काही जिल्ह्याना यलो अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह तशी 50 ते 60 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर विदर्भात बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वाशीम,यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया भागात वादळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तव्यात आली आहे.