पावसामुळे महाराष्ट्रात भयावय परिस्थिती आहे.मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक समस्यांना सामोरी जात आहे.दरम्यान, राज्यातील रायगडमध्ये दरडी कोसळण्याच्या चार घटना घडल्या असून त्यावरून वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे.या घटनेत स्थानिक पोलिसांनी 15 जणांची सुटका केली तर किमान 30 लोक अजूनही आत अडकले आहेत. या दरम्यान 5 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे पावसामुळे तलाई गावाला जाणारा रस्ता वाहून गेला आहे. रायगड जिल्हाधिकारींनी ही माहिती दिली आहे.
येथे, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शुक्रवारी मुंबईला ऑरेंज अलर्ट अंतर्गत ठेवले आहे. वेगळ्या ठिकाणी "मुसळधार ते अति मुसळधार पाऊस" पडण्याची शक्यता आहे.याव्यतिरिक्त, आयएमडीने 24 आणि 25 जुलैला यलो अलर्ट जारी केला आहे.जे वेगवेगळ्या ठिकाणी अति मुसळधार पाऊस येण्याचे संकेत आहे.
शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, वाहतुकीची कोंडी होत आहे. सांताक्रूझ येथील आयएमडीच्या स्थानकात सायंकाळी 5 :30 वाजे पर्यंत आठ तासांत फक्त 1.1 मिमी पावसाची नोंद झाली. या महिन्यात एकूण पाऊस 1,040 मिमी होता आणि सलग चौथ्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या पावसाने 1000 मि.मी.चा टप्पा ओलांडला.जुलै महिन्यात पावसाचे सामान्य लक्ष्य 827 मिमी आहे. जूनपासून शहरामध्ये 2,002.5 मिमी पाऊस पडला असून, हा एकूण मॉन्सूनच्या 90% टक्क्यांहून अधिक आहे.
रेल्वे मार्ग विस्कळीत, सहा हजार प्रवासी अडकले
गुरुवारी कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवेवर परिणाम झाला. महाराष्ट्रात नद्यांना पूर आला आणि सुमारे सहा हजार प्रवासी अडकले. मुसळधार पावसामुळे मुंबईसह राज्यातील इतर अनेक ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे प्रशासनाला बचाव कार्यात मदत करण्यासाठी एनडीआरएफ बोलावले. कोकण रेल्वेचे प्रवक्ते म्हणाले की, या गाड्यांमधील प्रवासी सुरक्षित आहेत.सर्व अडचणी असूनही कोकण रेल्वे कडून प्रवाशांना खाण्यापिण्याची सोय केली जात आहे.रेल्वेचे प्रवक्ते म्हणाले, “अडकलेल्या सर्व प्रवाशांना आम्ही चहा, स्नॅक्स आणि पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था केली आहे.”
47 गावांशी सम्पर्क तुटला
दरम्यान, राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रस्ते तुंबल्यामुळे तब्बल 47 गावांशी संपर्क तुटला आहे आणि 965 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पावसात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी एका महिलेसह दोन जण पाण्यात वाहून गेले.
कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, मार्गावरील अडथळ्यामुळे नऊ गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानाच्या आधी वळविण्यात आल्या,थांबविल्या गेल्या किंवा रद्द केल्या गेल्या. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर सुरक्षित ठिकाणी आहेत आणि त्यांच्यातील प्रवासीही सुरक्षित आहेत. त्यांना खाण्यापिण्याची सोय केली जात आहे.