Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांचे मुलांच्या वेठबिगारी विरोधात पत्र

Raj Thackeray Letter
, शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (14:53 IST)
अश्या बातम्या मन विषन्न करतात .... राज ठाकरे यांचे मुलांच्या वेठबिगारी विरोधात पत्र 
मुलांच्या वेठबिगारीविरोधात राज ठाकरे आक्रमक झालायचं पाहायला मिळत आहे. त्या संधर्भात एक पत्र त्यांनी स्वतः ट्विट केलं आहे. लहान मुलांकडून वेठबिगारीची काम भरवून घेतली जात आहेत जे प्रगत महाराष्ट्राला न शोभणार आहे ,अश्या बातम्या मन विषन्न करतात असं ते म्हणत आहेत . जर कुठेही लहान मुलांसोबत असा प्रकार घडताना दिसला तर तशी तक्रार करा असं आवाहन पत्राद्वारे त्यांनी केलं आहे.
 
राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हणतात ......
गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. नाशिक, नगर, ठाणे, पालघर अशा जिल्ह्यांमध्ये वेठबिगारीचे प्रकार समोर येत आहेत. पैशासाठी मुलांवर वेठबिगारीची वेळ यावी, हे भीषण आहे. आज कायद्याने वेठबिगारीचं उच्चाटन झालं असलं तरी ही प्रथा अस्तित्वात आहे, आणि प्रगत म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात ह्या घटना आढळणं हे राज्याला शोभणारं नाही.
 
राज्यसरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ह्या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश तात्काळ द्यायला हवेत. वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.
 
पण हे करताना एकूणच जागृत समाजाने पण पुढे यायला हवं. वेठबिगारी ही क्रूर प्रथा आहे, आणि तिच्या निर्मूलनासाठी समाजात सतर्कता हवी. असे प्रकार तुम्हाला कुठेही आढळले तर तुम्ही पोलिसांची तक्रार करा किंवा जवळच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयाला किंवा माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकाला सूचित करा, ते कायदेशीर मदत घेऊन कारवाई तर करतीलच. . ह्या बातम्या परत कधीच वाचायला लागू नयेत हीच इच्छा.
 
गेल्या काही दिवसांपासून, विविध वर्तमानपत्रांमध्ये लहान मुलांना वेठबिगारी करण्यास भाग पाडलं जातंय, अशा आशयाच्या बातम्या वाचल्या. ह्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत.
 
वेठबिगारांचा शोध, सुटका आणि पुनर्वसन ह्याकडे संपूर्ण प्रशासनाने कमालीच्या सहानुभूतीने लक्ष द्यायला हवं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अण्णा हजारे यांचा राज्य सरकारला इशारा