Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा? राज ठाकरेंचा सवाल

मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा? राज ठाकरेंचा सवाल
, सोमवार, 8 मार्च 2021 (12:05 IST)
मुंबई- आज जगभरात जागतिक महिला दिन साजरा होत आहे. या दिनाच्या निमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तमाम महिलांना शुभेच्छा देत असा सवाल ही केला आहे की 'मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा?
 
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर करत 'आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही असे मत मांडले आहे.
 
त्यांनी म्हटले की आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, "बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील" .  तसेच ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी 365 दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान 365 दिवस साजरा झाला पाहिजे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Apple आपला लोकप्रिय iMac Pro कॉम्प्युटर बंद करीत आहे, फक्त शेवटची काही युनिट्स शिल्लक आहेत