राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी आणि नारळ फेकण्यात आले होते. ते बीडच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. त्या नांतर उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोमॅटो आणि शेण फेकले. या वर प्रतिक्रिया देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला हा कार्यकर्त्यांच्या संतापाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की काही लोकांनी त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकली होती, ज्याचा शिवसेनेने (यूबीटी) निषेध केला नाही, त्यामुळे निराश मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव यांच्या ताफ्याला लक्ष्य केले.
शनिवारी संध्याकाळी ठाण्यात शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी टोमॅटो आणि शेण फेकले होते
उद्धव यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी प्रशासनाने मनसेच्या ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. बीडमधील शिवसेना-यूबीटी जिल्हाप्रमुखांनी या घटनेचा निषेध न केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
ते म्हणाले, “ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांची ही कृती बीड जिल्ह्यातील शिवसेना-यूबीटी जिल्हाप्रमुखांनी निषेध न केल्यामुळे निराशेतून प्रेरित आहे. शिवसेना-यूबीटीकडून प्रतिसाद न मिळाल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, त्यामुळेच त्यांनी हे केल्याचे ते म्हणाले.