Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरेंच्या मनसेचे निवडणूक चिन्ह काढले जाणार, मान्यता रद्द होणार

Webdunia
सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 (16:38 IST)
राज ठाकरे यांच्या पक्षाला मनसेला विधानसभा निवडणूक मध्ये एक ही जागा मिळाली नाही. माहीम विधानसभा मतदार संघातून अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला आहे. विधानसभेत पराभूत झाल्यामुळे आता निवडणूक आयोग त्यांच्याकडून पक्षाचे निवडणूक चिन्ह परत घेणार आहे. 

या बाबतची माहिती महाराष्ट्र विधानसभेचे माजी सचिव अनंत काळसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 
 निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एखाद्याला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचे काही निकष आहेत जर एखाद्या पक्षाचा आमदार निवडून आला आणि त्याला एकूण मतांपैकी 8% मते मिळाली तर त्याची ओळख कायम राहते. जर 2 आमदार निवडून आले आणि त्यांना एकूण मतांच्या 6% मते मिळाली, जर 3 आमदारांना एकूण मतांच्या 3% मते मिळाली, तरच निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण होतात आणि पक्षाची मान्यता शिल्लक राहते.

या अटी पूर्ण न झाल्यास पक्षाची मान्यता रद्द केली जाऊ शकते. विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ 1.8 टक्के मत मिळाली असून एकही जागेवर विजय मिळाली नाही.
निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था असून ती निर्णय घेऊ शकते असे काळसे म्हणाले. त्यांना पक्षाच्या बाबतीत नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतो. 
 
मनसे पक्षाची मान्यता रद्द करणे म्हणजे मनसेला रेल्वे इंजिन निवडणूक चिन्हही मिळणार नाही. त्यांना पुढील निवडणुकीत मोकळे होणारे एक चिन्ह निवडावे लागेल, पण त्यामुळे पक्षाच्या नावावर परिणाम होणार नाही.असे  म्हणाले.
Edited By - Priya  Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

IND Vs AUS: पर्थ कसोटीत भारताचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव

Ipl mega auction : व्यंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा भारतीय बनला

मुलीच्या भावाने केले प्रियकराचे निर्घृण खून

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

भारतीय तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई, अंदमानच्या समुद्रामधून 5 टन ड्रग्ज जप्त

पुढील लेख
Show comments